SIDBI Bharti 2026: SIDBI मध्ये Grade A आणि Grade B अधिकारी पदांच्या 68 जागांसाठी भरती
या भरतीमध्ये General, Hindi, Legal आणि Systems/Information Technology (IT) अशा विविध शाखांचा समावेश आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.
अनुक्रमणिका
SIDBI Recruitment 2026 – भरतीचा संक्षिप्त आढावा
| तपशील | माहिती |
|---|---|
| भरतीचे विभाग | स्मॉल इंडस्ट्रिज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) |
| जाहिरात क्रमांक | Advertisement No. 8 / Grade ‘A’ and ‘B’ / 2026-27 |
| पदाचे नाव | असिस्टेंट मॅनेजर(ग्रेड A) आणि मॅनेजर(ग्रेड B) |
| एकूण पदे | 68 |
| नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
| अर्ज कण्याची पद्धत | ऑनलाइन |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 21 नोव्हेंबर 2026 |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 11 डिसेंबर 2026 |
SIDBI Recruitment 2026 – पद आणि रिक्त जागा
| पद | पद संख्या |
|---|---|
| असिस्टेंट मॅनेजर(ग्रेड A) | 63 |
| मॅनेजर(ग्रेड B) | 5 |
SIDBI Recruitment 2026 - वयोमर्यादा (Age Limit)
21 नोव्हेंबर 2026 रोजी.
| पद | किमान वय | कमाल वय |
|---|---|---|
| असिस्टेंट मॅनेजर(ग्रेड A) | 21 वर्षे | 30 वर्षे |
| मॅनेजर(ग्रेड B) | 25 वर्षे | 33 वर्षे |
जन्मतारखेची अट
- ग्रेड A: 21 नोव्हेंबर 1996 ते 21 नोव्हेंबर 2005 या कालावधीत जन्म झालेला असावा.
- ग्रेड B: 21 नोव्हेंबर 1993 ते 21 नोव्हेंबर 2001 या कालावधीत जन्म झालेला असावा.
वयोमर्यादेत सूट (Age Relaxation)
SC / ST/ESM/SIDBI कर्मचारी/1984 दंगलीत प्रभावित - 5 वर्षे, OBC- 3 वर्षे सूट असेल.
SIDBI Recruitment 2026 - शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
1. असिस्टंट मॅनेजर – ग्रेड ‘A’
- जनरल स्ट्रीम: कॉमर्स / इकॉनॉमिक्स / मॅथेमॅटिक्स / स्टॅटिस्टिक्स / बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन / इंजिनिअरिंग या विषयांतील पदवी किमान 60% गुणांसह (SC/ST/PwBD साठी 50%) किंवा कंपनी सेक्रेटरी (CS) / कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट (CMA) / चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट (CFA) / चार्टर्ड अकाउंटंट (CA) किंवा 2 वर्षांचा फुल-टाइम एमबीए/पीजीडीएम.
- हिंदी स्ट्रीम: हिंदी व इंग्रजी विषयांसह पदवी आणि हिंदी-इंग्रजी अनुवादातील 1 वर्षाचा पदव्युत्तर डिप्लोमा किंवा हिंदी/इंग्रजी विषयातील पदव्युत्तर पदवी किमान 50% गुणांसह व पदवी स्तरावर दुसरा भाषा विषय किमान 2 वर्षे शिकलेला असणे.
- लीगल स्ट्रीम: मान्यताप्राप्त विद्यापीठातून विधी (लॉ) पदवी किमान 50% गुणांसह (SC/ST/PwBD साठी 45%) आणि बार कौन्सिल ऑफ इंडियामध्ये अधिवक्ता म्हणून नोंदणी.
- सिस्टिम्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी) स्ट्रीम: कोणत्याही शाखेतील बी.ई./बी.टेक. किंवा एमसीए पदवी किमान 60% गुणांसह (SC/ST/PwBD साठी 55%).
2. मॅनेजर – ग्रेड ‘B’ (स्पेशालिस्ट स्ट्रीम)
- हिंदी स्ट्रीम: हिंदी व इंग्रजी विषयांसह पदवी आणि हिंदी-इंग्रजी अनुवादातील 1 वर्षाचा पदव्युत्तर डिप्लोमा किंवा हिंदी/इंग्रजी विषयातील पदव्युत्तर पदवी किमान 50% गुणांसह व पदवी स्तरावर दुसरा भाषा विषय किमान 2 वर्षे शिकलेला असणे.
- लीगल स्ट्रीम: मान्यताप्राप्त विद्यापीठातून विधी (लॉ) पदवी किमान 50% गुणांसह (SC/ST/PwBD साठी 45%) आणि बार कौन्सिल ऑफ इंडियामध्ये अधिवक्ता म्हणून नोंदणी.
- सिस्टिम्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी) स्ट्रीम: कोणत्याही शाखेतील बी.ई./बी.टेक. किंवा एमसीए पदवी किमान 60% गुणांसह (SC/ST/PwBD साठी 55%).
SIDBI Recruitment 2026 - अर्ज शुल्क (Application Fee)
| प्रवर्ग | अर्ज शुल्क |
|---|---|
| SC / ST / PwBD | ₹175 |
| General / OBC / EWS | ₹1,100 |
SIDBI Recruitment 2026 - महत्त्वाच्या तारखा व लिंक्स
| तपशील | तारीख / लिंक |
|---|---|
| ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख | 21 नोव्हेंबर 2026 |
| ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख | 11 डिसेंबर 2026 |
| Phase I व Phase II परीक्षा | 27 डिसेंबर 2026 (तात्पुरती) |
| मुलाखत | फेब्रुवारी 2027 (तात्पुरती) |
| अधिकृत वेबसाइट | क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | Apply Online |
| अधिकृत जाहिरात | क्लिक करा |
| Age Calculator | क्लिक करा |
SIDBI Recruitment 2026 - अर्ज करण्याची पद्धत (How to Apply Online)
SIDBI Recruitment 2026 साठी फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज करण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करा.
- सर्वप्रथम वरील टेबल मध्ये दिलेल्या Apply online बटणावर क्लिक करा.
- नवीन उमेदवारांनी Click Here for New Registration या पर्यायावर क्लिक करावे.
- उमेदवाराचे नाव, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी नोंदवा.
- Provisional Registration Number आणि Password प्राप्त होईल. तो सुरक्षित ठेवा.
- ऑनलाइन अर्जामध्ये वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्जातील सर्व माहिती Preview करून तपासा.
- Complete Registration या पर्यायावर क्लिक करा.
- लागू अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.
- अर्ज Submit करून E-Receipt आणि अर्जाची प्रत डाउनलोड करा.
SIDBI Recruitment 2026 - आवश्यक कागदपत्रे
- लेटेस्ट पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो.
- उमेदवाराची स्वाक्षरी.
- डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा.
- इंग्रजी भाषेतील हस्तलिखित घोषणा.
- शैक्षणिक गुणपत्रके.
- पदवी प्रमाणपत्र.
- पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र, लागू असल्यास.
- कामाचा अनुभव दर्शविणारे प्रमाणपत्र.
- SC/ST/OBC/EWS प्रमाणपत्र, लागू असल्यास.
- PwBD प्रमाणपत्र, लागू असल्यास.
- Legal Stream साठी Bar Council Registration Certificate.
अजून माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा.
SIDBI Recruitment 2026 - परीक्षा केंद्रे (Exam Centres)
SIDBI ऑनलाइन परीक्षेसाठी महाराष्ट्रातील खालील शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
- मुंबई / नवी मुंबई / ठाणे / MMR, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नांदेड, जळगाव
SIDBI Recruitment 2026 - वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
प्रश्न 1. SIDBI Recruitment 2026 अंतर्गत एकूण किती पदे भरली जाणार आहेत?
उत्तर: एकूण 68 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये Grade A ची 63 आणि Grade B ची 5 पदे आहेत.
प्रश्न 2. SIDBI भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 डिसेंबर 2026 आहे.
प्रश्न 3. Grade A पदासाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: किमान 21 वर्षे आणि कमाल 30 वर्षे.
प्रश्न 4. Grade B पदासाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: किमान 25 वर्षे आणि कमाल 33 वर्षे.
प्रश्न 5. SIDBI भरतीमध्ये कोणते Streams उपलब्ध आहेत?
उत्तर: Grade A मध्ये General, Hindi, Legal आणि Systems/IT Streams आहेत. Grade B मध्ये Hindi, Legal आणि Systems/IT Streams आहेत.
प्रश्न 6. SIDBI भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: SC/ST/PwBD उमेदवारांसाठी ₹175 आणि इतर उमेदवारांसाठी ₹1,100 आहे.
प्रश्न 7. SIDBI ऑनलाइन परीक्षा कधी होणार आहे?
उत्तर: Phase I आणि Phase II परीक्षा 27 डिसेंबर 2026 रोजी तात्पुरती नियोजित आहे.
प्रश्न 8. SIDBI भरतीची निवड प्रक्रिया कशी असेल?
उत्तर: Phase I Objective Examination, Phase II Objective आणि Descriptive Examination आणि Phase III Interview अशा तीन टप्प्यांत निवड प्रक्रिया होईल.
प्रश्न 9. Grade A General साठी MBA उमेदवार अर्ज करू शकतात का?
उत्तर: होय. जाहिरातीत नमूद अटींनुसार मान्यताप्राप्त संस्थेतील दोन वर्षांचा Full-time MBA/PGDM धारक अर्ज करू शकतात.
प्रश्न 10. एका उमेदवाराला दोन पदांसाठी अर्ज करता येईल का?
उत्तर: नाही. एका उमेदवाराला केवळ एका पदासाठी अर्ज करता येईल.
प्रश्न 11. SIDBI भरतीसाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा आहे?
उत्तर: फक्त ऑनलाइन पद्धतीने SIDBI च्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करता येईल.
प्रश्न 12. मुलाखत कोणत्या भाषेत देता येईल?
उत्तर: उमेदवार मुलाखत हिंदी किंवा इंग्रजी भाषेत देऊ शकतात.
प्रश्न 13. Grade A आणि Grade B पदांचे अंदाजे मासिक वेतन किती आहे?
उत्तर: Grade A साठी अंदाजे ₹1,20,000 आणि Grade B साठी अंदाजे ₹1,45,000 Gross Monthly Emoluments आहेत.
प्रश्न 14. SIDBI परीक्षेत Negative Marking आहे का?
उत्तर: होय. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी त्या प्रश्नाच्या गुणांच्या 1/4 गुणांची कपात केली जाईल.
प्रश्न 15. SIDBI ची अधिकृत वेबसाइट कोणती आहे?
उत्तर: https://www.sidbi.in/
महाराष्ट्रातील सरकारी नोकरी, भरती, प्रवेशपत्र, निकाल आणि स्पर्धा परीक्षांच्या माहितीसाठी भेट द्या: https://naukrimanthan.com/
