▦
FREE ONLINE TOOL

Age Calculator

तुमचे अचूक वय वर्षे, महिने आणि दिवसांमध्ये मोजा.

Calculate your exact age for any date.

Enter Your Details

Your Age Result

◷
—
Enter your details to calculate your age.
Years—
Months—
Days—
Total Days—

Date of Birth—

Day of Birth—

Next Birthday—

Days Remaining—

Important for Government Job Applicants

भरतीसाठी वय मोजताना अधिकृत जाहिरातीतील cut-off date, वयोमर्यादा, प्रवर्गनिहाय सूट आणि संबंधित नियम तपासा. हा टूल सामान्य वय मोजण्यासाठी आहे; तो भरतीची पात्रता निश्चित करत नाही.

Age Calculator – तुमचे अचूक वय जाणून घ्या.

तुमचे वय नेमके किती वर्षे, महिने आणि दिवसाचे झालेले आहे, हे जाणून घ्यायचे आहे का? तर, Naukrimanthan.com मंचावरील Age Calculator या  टुल च्या मदतीने तुम्ही काही सेकंदांत तुमचे वयाची गणना करू शकता. तुम्हाला फक्त तुमची जन्मतारीख निवडायची आहे आणि ज्या तारखेला वय मोजायचे आहे ती तारीख टाकायची आहे. त्यानंतर Calculate Age या बटणावर क्लिक करून तुमच्या वयाची गणना केलेली तुम्ही पाहू शकता.

हा ऑनलाइन Age Calculator टुल वापरण्यास अतिशय सोपा आहे. या टुल चा उपयोग, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमेदवार आणि स्वतःचे वय अचूकपणे जाणून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला Naukrimanthan.com  या मंचावरील Age Calculator या टुल चा उपयोग होऊ शकतो.

Age Calculator टुल चा वापर कसा करायचा ?

वयाची गणना करण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा.

  1. Date of Birth: तुमची जन्मतारीख निवडा.

  2. Calculate Age As On: ज्या तारखेला तुमचे वय मोजायचे आहे ती तारीख निवडा.

  3. Display Format: वय वर्षे, महिने आणि दिवसांत पाहायचे आहे की फक्त पूर्ण झालेल्या वर्षांत, ते निवडा.

  4. Calculate Age: या बटणावर क्लिक करा.

तुमचे वय स्क्रीनवर दिसेल. त्यामध्ये पूर्ण झालेली वर्षे, महिने, दिवस, जन्माचा वार, एकूण दिवस आणि पुढील वाढदिवसापर्यंतचे उरलेले दिवस यांची माहिती मिळेल. Copy Result या पर्यायाने निकाल कॉपी सुद्धा करता येतो.

Age Calculator टुल वापरण्याचे फायदे…

  • वयाची गणना ही वर्षे, महिने आणि दिवसांत करता येते: तुमचे वय अधिक तपशीलवार समजते.

  • एकूण पूर्ण झालेली वर्षे पाहता येतात: फक्त पूर्ण झालेल्या वयाची माहिती मिळते.

  • एकूण किती दिवस झाले ते पाहता येते: जन्मतारखेपासून निवडलेल्या तारखेपर्यंतचे दिवस समजतात.

  • जन्माचा वार पाहता येतो : तुमचा जन्म कोणत्या दिवशी झाला हे पाहता येते.

  • पुढील वाढदिवस कधी येईल याची गणना: पुढील वाढदिवसाची तारीख आणि त्यासाठी उरलेले दिवस समजतात.

  • निकाल कॉपी करण्याची सुविधा मिळते: मिळालेला निकाल सहज कॉपी करता येतो.

सरकारी नोकरी आणि स्पर्धा परीक्षांसाठी वय कसे मोजावे?

MPSC, तलाठी भरती, पोलीस भरती, वनरक्षक, आरोग्य सेवक, शिक्षक भरती, रेल्वे भरती, SSC आणि इतर सरकारी भरतींसाठी अर्ज करताना वयोमर्यादा तपासणे खूप महत्त्वाचे असते. उमेदवाराचे वय संबंधित भरतीच्या अधिकृत जाहिरातीत दिलेल्या cut-off date नुसार मोजले जाऊ शकते.

त्यामुळे फक्त आजच्या तारखेनुसार वय पाहून भरतीसाठी पात्रता ठरवू नका. संबंधित जाहिरातीतील किमान वय, कमाल वय, आरक्षणानुसार वयोमर्यादेतील सूट आणि वय मोजण्याची पद्धत काळजीपूर्वक तपासा मगच वयाची गणना करा.

Naukrimanthan.com या मंचवरील Age Calculator हा टुल सामान्य वय मोजण्यासाठी उपयोगी आहे. तो स्वतःहून कोणत्याही सरकारी भरतीसाठी पात्रता निश्चित करत नाही.

Age Calculator बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. Age Calculator वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतात का?

हा ऑनलाइन Age Calculator टुल विनामूल्य वापरण्यासाठी तयार केलेला आहे.

2. मी माझ्या वयाची गणना वर्षे, महिने आणि दिवसांत करू शकतो का?

होय. Years, Months & Days हा पर्याय निवडून तुम्ही तुमचे वय या स्वरूपात पाहू शकता.

3. फक्त पूर्ण झालेली वर्षे कशी मोजायची?

Display Format मध्ये Completed Years हा पर्याय निवडा. त्यानंतर Calculate Age वर क्लिक करा.

4. सरकारी नोकरीसाठी वयोमर्यादा तपासता येते का?

हा टूल तुमचे वय मोजण्यास मदत करतो. मात्र, सरकारी नोकरीसाठी पात्रता ठरवताना अधिकृत भरती जाहिरात आणि त्यातील cut-off date तपासणे आवश्यक आहे.

5. जन्मतारीख बदलून दुसऱ्या तारखेनुसार वय मोजता येते का?

होय. जन्मतारीख आणि उपलब्ध calculation date निवडून पुन्हा वय मोजता येते.


नौकरी विषयक जाहिराती सर्वात जलद मिळवण्यासाठी “www.Naukrimanthan.com” या संकेतस्थळाला दररोज भेट द्यायला विसरू नका.

Scroll to Top