Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026 : वसई-विरार महानगरपालिकेत 156 पदांसाठी मेगा भरती
Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026 : महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील विविध तांत्रिक व अतांत्रिक पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. वसई-विरार महानगरपालिका भरती 2026 या भरतीअंतर्गत एकूण 18 संवर्गांतील 156 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
या भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), उद्यान निरीक्षक, सहाय्यक रसायनतंत्रज्ञ, आरेखक, सर्व्हेअर, विजतंत्री, आरोग्य निरीक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, लिपिक-टंकलेखक, सहाय्यक विधी अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, गाळणी निरीक्षक, अग्निशमन केंद्र अधिकारी, उप-अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रमुख अग्निशमन विमोचक या पदांचा समावेश आहे.
या लेखामध्ये Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2026 भरतीची पदनिहाय माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा शुल्क, निवड प्रक्रिया आणि अर्ज करण्याची पद्धत सविस्तर दिली आहे.
अनुक्रमणिका
- Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026 – संक्षिप्त माहिती
- VVCMC Vacancy 2026 – पदनिहाय रिक्त जागांचा तपशील
- Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2026 – शैक्षणिक पात्रता
- Vasai Virar Bharti 2026 – वयोमर्यादा
- VVCMC Recruitment 2026 – अर्ज शुल्क
- Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026 – महत्त्वाच्या तारखा व लिंक्स
- वसई-विरार महानगरपालिका भरती 2026 – अर्ज कसा करावा?
- अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
📌 हेही वाचा – Akola Nagarparishad Bharti 2026
Akola Nagarparishad Bharti 2026 Akola Nagarparishad Bharti 2026 : अकोला जिल्ह्यात 103 पदांसाठी मेगा भरती ➜Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026 – संक्षिप्त माहिती
| तपशील | माहिती |
|---|---|
| भरतीचे नाव | वसई-विरार शहर महानगरपालिका सरळसेवा भरती 2026 |
| जाहिरात क्रमांक | आस्था/प्रशा 2(ब)/1580/2026 |
| नोकरीचे ठिकाण | वसई-विरार, जिल्हा पालघर, महाराष्ट्र |
| एकूण पदे | 156 |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
| अधिकृत वेबसाइट | www.vvcmc.in |
VVCMC Vacancy 2026 – पदनिहाय रिक्त जागांचा तपशील
| पदाचे नाव | पदसंख्या | पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|---|---|
| कनिष्ठ अभियंता (विद्युत) | 07 | सहाय्यक ग्रंथपाल | 01 |
| कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) | 02 | लिपिक-टंकलेखक | 50 |
| कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 50 | सहाय्यक विधी अधिकारी | 01 |
| उद्यान निरीक्षक | 03 | सांख्यिकी अधिकारी | 01 |
| सहाय्यक रसायनतंत्रज्ञ | 02 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 01 |
| आरेखक | 04 | गाळणी निरीक्षक | 03 |
| सर्व्हेअर | 04 | अग्निशमन केंद्र अधिकारी | 02 |
| विजतंत्री | 10 | उप-अग्निशमन केंद्र अधिकारी | 04 |
| आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक | 01 | प्रमुख अग्निशमन विमोचक | 10 |
| एकूण | 156 | ||
📌 हेही वाचा – Aurangabad High Court Bharti 2026
Aurangabad High Court Bharti 2026 कनिष्ठ अनुवादक व दुभाषी पदासाठी भरती; वेतन ₹49,100 ते ₹1,55,800 ➜Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2026 – शैक्षणिक पात्रता
| अ.क्र. | पदाचे नाव | मुख्य पात्रता व अनुभव (Brief Qualification) |
|---|---|---|
| 1 | कनिष्ठ अभियंता (विद्युत) | Electrical Engineering पदवी किंवा पदविका (Diploma) + 3 वर्षे अनुभव |
| 2 | कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) | Mechanical / Automobile Engg. पदवी किंवा पदविका (Diploma) + 3 वर्षे अनुभव |
| 3 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | Civil Engineering पदवी किंवा पदविका (Diploma) + 3 वर्षे अनुभव |
| 4 | उद्यान निरीक्षक | B.Sc. (Horticulture / Agriculture / Botany / Forestry) |
| 5 | सहाय्यक रसायनतंत्रज्ञ | M.Sc. (Chemistry / Microbiology / Environmental Science) + 2 वर्षे अनुभव |
| 6 | आरेखक (Draftsman) | 10 वी (SSC) किंवा 12 वी (HSC) + ITI (Draftsman) किंवा समतुल्य कोर्स |
| 7 | सर्व्हेअर (Surveyor) | Civil Engineering पदविका किंवा 10 वी + ITI (Surveyor) + टायपिंग (मराठी 30 / इंग्रजी 40) |
| 8 | विजतंत्री (Electrician) | 10 वी (SSC) उत्तीर्ण + ITI (Electrician) |
| 9 | आरोग्य / स्वच्छता निरीक्षक | किमान 12 वी (HSC) / पदवी (विज्ञान पदवी व अनुभवास प्राधान्य) |
| 10 | सहाय्यक ग्रंथपाल | B.Lib. पदवी (M.Lib. आणि अनुभवास प्राधान्य) |
| 11 | लिपिक-टंकलेखक | 10 वी (SSC) + टायपिंग (मराठी 30 किंवा इंग्रजी 40) + MS-CIT |
| 12 | सहाय्यक विधी अधिकारी | विधी पदवी (LLB) + 5 वर्षे न्यायालयीन / वकिली अनुभव |
| 13 | सांख्यिकी अधिकारी | सांख्यिकी (Statistics) पदवी (पदव्युत्तर पदवी व अनुभवास प्राधान्य) |
| 14 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | B.Sc. (Chemistry / Microbiology) + DMLT किंवा M.Sc. (3 वर्षे अनुभवास प्राधान्य) |
| 15 | गाळणी निरीक्षक | B.Sc. (Chemistry) + वॉटर ट्रीटमेंट प्लांटचा 3 वर्षे अनुभव |
| 16 | अग्निशमन केंद्र अधिकारी | कोणतीही पदवी + अग्निशमन अधिकारी कोर्स + MS-CIT + शारीरिक पात्रता + 2-3 वर्षे अनुभव (वयोमर्यादा: 40 वर्षे) |
| 17 | उप-अग्निशमन केंद्र अधिकारी | कोणतीही पदवी + उप-अग्निशमन अधिकारी कोर्स + MS-CIT + शारीरिक पात्रता + 3-5 वर्षे अनुभव (वयोमर्यादा: 35 वर्षे) |
| 18 | प्रमुख अग्निशमन विमोचक | 10 वी (SSC) + 6 महिने अग्निशामक प्रशिक्षण कोर्स + MS-CIT + शारीरिक पात्रता + 5 वर्षे अनुभव (वयोमर्यादा: 30 वर्षे) |
Vasai Virar Bharti 2026 – वयोमर्यादा
01 नोव्हेंबर 2026 रोजी [खुला प्रवर्ग - 18 वर्षे ते 38 वर्षे, मागासवर्गीय- 18 वर्षे ते 43 वर्षे, दिव्यांग / प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त / स्वातंत्र्यसैनिकांचे पाल्य- 18 वर्षे ते 45 वर्षे, अंशकालीन उमेदवार - 18 वर्षे ते 55 वर्षे (तसेच अग्निशमन केंद्र अधिकारी- 18 वर्षे ते 40, उप-अग्निशमन केंद्र अधिकारी -18 वर्षे ते 35 वर्षे आणि प्रमुख अग्निशमन विमोचक पदासाठी - 18 वर्षे ते 30 वर्षे.]
VVCMC Recruitment 2026 – अर्ज शुल्क
| प्रवर्ग | परीक्षा शुल्क |
|---|---|
| खुला प्रवर्ग | ₹1,000 |
| मागासवर्गीय, अनाथ, दिव्यांग व आर्थिक दुर्बल घटक | ₹900 |
| माजी सैनिक | शुल्क नाही |
Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026 – महत्त्वाच्या तारखा व लिंक्स
| कार्यक्रम | दिनांक / वेळ |
|---|---|
| ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख | 26 नोव्हेंबर 2026 |
| ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख | 17 डिसेंबर 2026 |
| परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख | 17 डिसेंबर 2026 |
| अधिकृत वेबसाइट | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात | क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज करा | Apply Online |
| Age calculator | क्लिक करा |
वसई-विरार महानगरपालिका भरती 2026 – अर्ज कसा करावा?
ऑनलाइन अर्ज करण्याच्या स्टेप्स:
- सर्वप्रथम वरील टेबल मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करून वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- भरतीसंबंधित अधिकृत जाहिरात आणि सूचना काळजीपूर्वक वाचा.
- भरती पोर्टलवरील Apply Online पर्याय निवडा.
- नवीन उमेदवार असल्यास नवीन नोंदणी करून Login ID व Password तयार करा.
- वैयक्तिक माहिती, संपर्क तपशील, शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची माहिती भरा.
- आवश्यकतेनुसार छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- अर्जातील सर्व माहिती तपासून अर्ज अंतिम स्वरूपात सबमिट करा.
- लागू असलेले परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा.
- अर्जाची प्रत आणि शुल्क भरल्याची ई-पावती डाउनलोड करून जतन करा.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.
- जन्मतारखेचा पुरावा.
- शाळा सोडल्याचा दाखला.
- SSC/HSC गुणपत्रिका व प्रमाणपत्र.
- पदवी/पदविका/पदव्युत्तर पदवीची गुणपत्रिका व प्रमाणपत्र.
- संबंधित पदासाठी आवश्यक ITI/तांत्रिक प्रमाणपत्र.
- अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास).
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास).
- जात वैधता प्रमाणपत्र (लागू असल्यास).
- नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र (लागू असल्यास).
- EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास).
- अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate).
- MS-CIT किंवा समकक्ष संगणक प्रमाणपत्र (लागू असल्यास).
- मराठी व इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्र (लागू असल्यास).
- दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास).
- माजी सैनिक प्रमाणपत्र (लागू असल्यास).
- खेळाडू/प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त/अंशकालीन/अनाथ आरक्षणाचे प्रमाणपत्र (लागू असल्यास).
- नाव बदलाचा अधिकृत पुरावा (लागू असल्यास).
- फोटो, स्वाक्षरी आणि ओळखपत्र.
कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रांसह प्रत्येकी दोन स्वसाक्षांकित प्रती घेऊन उपस्थित राहणे आवश्यक आहे.
Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
1. वसई-विरार महानगरपालिका भरती 2026 मध्ये एकूण किती पदे आहेत?
या भरतीअंतर्गत गट-क संवर्गातील 18 विविध पदांसाठी एकूण 156 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
2. वसई-विरार महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कधी सुरू होणार आहेत?
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 26 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होणार आहे.
3. अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उमेदवारांना 17 डिसेंबर 2026 रोजी रात्री 11:55 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल.
4. या भरतीसाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे?
पदानुसार SSC, HSC, ITI, अभियांत्रिकी पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, टंकलेखन प्रमाणपत्र आणि संबंधित कामाचा अनुभव आवश्यक आहे.
5. वसई-विरार महानगरपालिका भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
सामान्य पदांसाठी खुल्या प्रवर्गाची कमाल वयोमर्यादा 38 वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्षे आहे. काही प्रवर्गांना नियमानुसार वयोमर्यादा सवलत लागू आहे. अग्निशमन विभागातील पदांसाठी स्वतंत्र वयोमर्यादा आहे.
6. या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
खुल्या प्रवर्गासाठी ₹1,000, मागासवर्गीय, अनाथ, दिव्यांग व EWS उमेदवारांसाठी ₹900 आणि माजी सैनिकांसाठी शुल्क नाही.
7. वसई-विरार महानगरपालिका भरतीसाठी परीक्षा कशी होणार आहे?
निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन परीक्षा आणि आवश्यकतेनुसार कागदपत्र पडताळणीचा समावेश आहे. परीक्षेचा तपशील अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल.
8. लिपिक-टंकलेखक पदासाठी टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक आहे का?
होय. मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट या वेगाचे आवश्यक प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. तसेच संगणक पात्रतेची अटही लागू आहे.
9. अग्निशमन विभागातील पदांसाठी शारीरिक पात्रता आवश्यक आहे का?
होय. अग्निशमन केंद्र अधिकारी, उप-अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रमुख अग्निशमन विमोचक या पदांसाठी जाहिरातीत नमूद केलेली उंची, छाती, वजन व दृष्टीविषयक पात्रता लागू आहे.
10. अधिकृत जाहिरात कुठे पाहता येईल?
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर https://www.vvcmc.in येथे भरतीची जाहिरात व इतर सूचना उपलब्ध आहेत.
NaukriManthan.com – सरकारी नोकरी, नवीन भरती, प्रवेशपत्र, निकाल आणि स्पर्धा परीक्षांच्या अपडेट्ससाठी NaukriManthan.com ला नियमित भेट द्या.
